Marathi ukhane for female: स्त्रियांसाठी जबरदस्त मराठी उखाणे भाग 1
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत जबरदस्त
मराठी उखाणे.
सध्या लग्नसराई धूमधडाक्यात सुरू आहे आणि लग्नसराई म्हणलं की उखाणे तर आलेच. तसेच हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या शुभकार्यामध्ये उखाणे घेण्याची परंपरा आहे.
पारंपारिक भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया आपल्या पतीचे नाव घेणं टाळत असत. विवाहप्रसंगी तसेच शुभप्रसंगी स्त्रियांना पतीचे नाव घेण्यास सांगितले जात असे. अशावेळी स्त्रिया काव्यमय ओळींमध्ये आपल्या पतीचे नाव घेत असत,यालाच उखाणे असे म्हंटले जाते.
खाली स्त्रियांसाठी काही सुंदर उखाणे दिले आहेत :
1) मुंबई ते पुणे पेरला जवस,
मुंबई ते पुणे पेरला जवस,
---- रावांसाठी केला होता
गणपतीला नवस
Background Credit:- The Wedding Sheet
2) अंगणात होती तुळस ,
तुळशीला पाणी घालू किती,
--- रावांच्या हातात
सत्यनारायणाची पोथी
Background Credit:- Sharpahotz Photography
3) नदीच्या काठावर कान्हा वाजवितो बासरी
नदीच्या काठावर कान्हा वाजवितो बासरी
--- रावांचे नाव घेते मी आले सासरी
Background Credit:- Roohie X Jason
4) गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस,
गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस,
--- रावांचे नाव घ्यायचा मला नाही आळस
Background Credit:- Instagram
5) महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून,
--- रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून
Background Credit:-Infinite Memories
6) चांदीच्या परातीत केशराचे पेढे,
चांदीच्या परातीत केशराचे पेढे,
आमचे --- राव सोडून सगळे वेडे
Background Credit:- Instagram
7) जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने,
--- रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
Background Credit:- Avnish Dhoundiyal Photography
8) मंगळसूत्राच्या दोन वाटी, सासर आणि माहेर,
मंगळसूत्राच्या दोन वाटी, सासर आणि माहेर,
--- रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे
Background Credit:- Deepika Padukone
9) दारात पिंपळ, पिंपळाची गार - गार सावली,
Comments
Post a Comment