मराठी उखाणे / Marathi Ukhane : स्त्रियांसाठी जबरदस्त मराठी उखाणे भाग 2
विवाहप्रसंगी उखाणा घेण्याचा आग्रह केल्यानंतर, कोणता उखाणा घेऊ याचे टेन्शन घेण्याची आता अजिबात गरज नाही कारण मराठी उखाणे आपल्यासाठी घेउन आले आहेत जबरदस्त आणि दर्जेदार मराठी उखाणे.
उखाण्यामधून पुरुष आणि स्त्री एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतात.आता तुम्हीसुद्धा तुमच्या आवडत्या व्यक्तीविषयी प्रेम बिनधास्त पणे व्यक्त करू शकतात कारण इथे आहेत तुमच्यासाठी सुंदर अशा मराठी उखाण्यांचा खजिना.
स्वतःही वाचा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.
चला तर मग घ्या सुंदर उखाण्यांचा आस्वाद :-
1) मारुतीच्या देवळात अगरबत्तीचा वास,
मारुतीच्या देवळात अगरबत्तीचा वास,
--- रावांच्या तोंडात पेढ्याचा घास.
Background Credit :- Pinterest
2) विवाहाला आमच्या गर्दी झाली दाट,
विवाहाला आमच्या गर्दी झाली दाट,
--- रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
Background Credit :-Pinterest
3) अंगणात होती तुळस , तुळशीला पाने सात,
अंगणात होती तुळस , तुळशीला पाने सात,
--- राव आहेत माझ्या हृदयाच्या आत.
Background Credit :- Nomi Ansari
4) रायगड किल्ला आहे , महाराष्ट्राची शान,
रायगड किल्ला आहे , महाराष्ट्राची शान,
--- राव आहेत माझा जीव की प्राण.
Background Credit :- Pinterest
5) डोंगरावर बहरली आहे करवंदाची जाळी,
डोंगरावर बहरली आहे करवंदाची जाळी,
रावांचे नाव घेते कुंकू लावून कपाळी.
Background Credit :- Pinterest
6) संपूर्ण जगात लोकप्रिय राधा - कृष्णाची जोडी,
संपूर्ण जगात लोकप्रिय राधा - कृष्णाची जोडी,
--- रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
Background Credit :- The W Story
7) महादेवाला आवडते बेलाचे पान,
महादेवाला आवडते बेलाचे पान,
--- रावांचे नाव घेते राखून तुमचा मान.
Background Credit :- Mehar Photography
8) ढगांच्या वर जावून उडतो गरुड पक्षी,
ढगांच्या वर जावून उडतो गरुड पक्षी,
--- रावांचे नाव घेते, चंद्र-सूर्य आहेत साक्षी.
Background Credit :- Photo by Pune Dusk
9) सगळ्यांपुढे आशिर्वादासाठी जोडते हात,
सगळ्यांपुढे आशिर्वादासाठी जोडते हात,
--- रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.
Background Credit :- Recall Pictures
10) हिरवीगार झाडे, नदीच्या काठी,
हिरवीगार झाडे, नदीच्या काठी,
--- रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.
Background Credit :- Sweet Caribbean Photo & Video
Comments
Post a Comment